| जर आपले संरक्षण आपण स्वतःच करावयाचे असेल तर प्रत्येकाने 'मर्दानी खेळ शिकलेच पाहिजे अशी अपेक्षा "मर्दानी खेळ" हा व्यायामाचा भाग सुद्धा होऊ शकतो. या खेळामुळे आपला आत्मविश्वास वादतो, शिवाय शरीर पण लवचिक राहते. धाडस वाढले जाऊन मानसिक संतुलनसुद्धा राखले जाते. आजची आपती दैनंदिन परिस्थिती पाहिली तर आपल्या घरातही आपण सुरक्षित नाही अशी भावना सर्व लोकांत आढळून येते. सध्या याच कारणासाठी आपणही जुनी युद्धकला आत्मसात करण्याची गरज आहे. या खेळामुळे आत्मविश्वासाबरोबरच धाडस सुद्धा वाढते आणि धाडसामुळे महत्त्वाकांक्षा तयार होते. महत्त्वाकांक्षा तयार झाली की, कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्या धाडशी वृत्तीमुळे आपण मुसंडी मारतो. अर्थातच आपण विजयाच्या दिशेने वाटचाल करू लागतो. जीवनात अनेक प्रकारची संकटे येतात-जातात. येणाऱ्या संकटांना, मग ती कोणतीही असोत, उदा. आर्थिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक इ. त्यांना सामोरे जाऊन ती नेस्तनाबूत करण्याची ताकद आपल्याता मर्दानी खेळाच्या माध्यमातून मिळू शकते. असा माझा स्वत:चा अनुभव आहे. "मर्दानी खेळात" सुद्धा मानसशास्त्र आहे. खेळ कोणताही असो, प्रत्येक खेळाडू हा त्या खेळातील विजयश्री खेचून आणण्यासाठी प्रयत्न करीत असतो. आणि तोच खेळाडू खेळातील विजयश्रीप्रमाणेच आपल्या जीवनात येणाऱ्या स्पर्धांमध्ये विजयश्री खेचून आणतो. खेळाचा मनावर देखील परिणाम होत असतो. आपल्या व्यवसायात, नोकरीत, शिक्षणात तसेच येईल त्या प्रसंगाता सामोरे जाण्याची शक्ती येते. | | जर आपले संरक्षण आपण स्वतःच करावयाचे असेल तर प्रत्येकाने 'मर्दानी खेळ शिकलेच पाहिजे अशी अपेक्षा "मर्दानी खेळ" हा व्यायामाचा भाग सुद्धा होऊ शकतो. या खेळामुळे आपला आत्मविश्वास वादतो, शिवाय शरीर पण लवचिक राहते. धाडस वाढले जाऊन मानसिक संतुलनसुद्धा राखले जाते. आजची आपती दैनंदिन परिस्थिती पाहिली तर आपल्या घरातही आपण सुरक्षित नाही अशी भावना सर्व लोकांत आढळून येते. सध्या याच कारणासाठी आपणही जुनी युद्धकला आत्मसात करण्याची गरज आहे. या खेळामुळे आत्मविश्वासाबरोबरच धाडस सुद्धा वाढते आणि धाडसामुळे महत्त्वाकांक्षा तयार होते. महत्त्वाकांक्षा तयार झाली की, कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्या धाडशी वृत्तीमुळे आपण मुसंडी मारतो. अर्थातच आपण विजयाच्या दिशेने वाटचाल करू लागतो. जीवनात अनेक प्रकारची संकटे येतात-जातात. येणाऱ्या संकटांना, मग ती कोणतीही असोत, उदा. आर्थिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक इ. त्यांना सामोरे जाऊन ती नेस्तनाबूत करण्याची ताकद आपल्याता मर्दानी खेळाच्या माध्यमातून मिळू शकते. असा माझा स्वत:चा अनुभव आहे. "मर्दानी खेळात" सुद्धा मानसशास्त्र आहे. खेळ कोणताही असो, प्रत्येक खेळाडू हा त्या खेळातील विजयश्री खेचून आणण्यासाठी प्रयत्न करीत असतो. आणि तोच खेळाडू खेळातील विजयश्रीप्रमाणेच आपल्या जीवनात येणाऱ्या स्पर्धांमध्ये विजयश्री खेचून आणतो. खेळाचा मनावर देखील परिणाम होत असतो. आपल्या व्यवसायात, नोकरीत, शिक्षणात तसेच येईल त्या प्रसंगाता सामोरे जाण्याची शक्ती येते. |
| + | इतिहास पहायचा झाल्यास आपणास मानवाच्या अगदी प्रारंभ काळापासूनचा कालखंड लक्षात घ्यावयास हवा जेव्हा मानवाची उत्क्रांती होत होती तेव्हा मनुष्य एक जंगली प्राणी होता इतर प्राण्यांप्रमाणेच त्याचे राहणीमान असायचे, जगण्यासाठीची धडपड करावी लागायची. जंगली प्राण्यापासून स्वरक्षणांसाठी आवाजांचा, नखांचा, दातांचा उपयोग करावा लागत असे. हातांच्या मुठीमध्ये धरता येण्याजोग्या दगडांच्या कपारीचा उपयोग त्याने अश्मयुगांत केला. पुढे झाडांच्या फांद्याचा उपयोग केला. धातूच्या शोधामुळे अनेक सोप्या पद्धतीचा वापर त्याने आपल्या जीवनात केला. पहिल्यापहिल्यांदा फक्त स्वरक्षणासाठी मारणे या उद्देशापुरताच याचा उपयोग होत होता. मात्र नंतरच्या काळात त्याला विशिष्ट शास्त्र निर्माण झाले विविध आयुधांमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने बदल करून ते योग्यरितीने कसे हाताळायचे याचे नियम व धडे दिले गेले. यातूनच जगाच्या कानाकोपऱ्यात विविध प्रकारचे आत्मरक्षणाचे कलाप्रकार अस्तित्वात आले मल्जविद्या, कुंगफु, जुजुत्स्तु, कराटे ज्युदो, या व अशा अनेक कला क्रीडा प्रकार निर्माण झाले. आजच्या युगात जरी हे खेळ प्रकार म्हणून आपण पहात असलो तरी हे मुळात आत्मरक्षणाची कला या मुलभूत तत्वातूनच निर्माण झालेले शास्त्र आहे. |
| + | हिंदूस्थानात आणि जगात विविध प्रकारचे क्रीडा प्रकार पहावयास मिळतात आणि या विविध क्रीडा प्रकारांचा इतिहासही तितकाच रंजक आहे. खेळ हा करमणुकीसाठी खेळला जातो त्याच्या अंतर्गतच स्पर्धा, उत्कर्ष या बाबींचा समावेश असतो. दोन किंवा दोहोपेक्षा जास्त लोक एकत्र येऊन खेळ खेळले जातात पण कला ही साधारणतः एकट्यापुरती मर्यादित असू शकते. एखाद्या कलेचे सामुदायिक प्रदर्शन किंवा प्रात्यक्षिक सादर केले जाते, त्यावेळी त्यास स्पर्धेचे स्वरूप प्राप्त होते. पण मुळात कला ही साधनेची समाधानाची, त्यागाची गोष्ट आहे जी व्यक्तिगत असते. मर्दानी खेळ ही मुळात कला आहे जी आत्मरक्षणाच्या उद्देशाने विकसित केली किंवा झाली. त्यामुळे शिकत असताना खेळ म्हणून नव्हे तर कला म्हणून आत्मसात करणे आवश्यक आहे. जेव्हा यात प्राविण्य मिळते तेव्हा त्याचे प्रदर्शन, प्रात्यक्षिक करावयाचे जे खेळ स्वरूपात असते.पूर्वी रणांगणात लढणार्या सैनिकांना तसेच राजा व इतर प्रतिष्ठित मान्यवरांच्या करमणुकीसाठी अनेक प्रकारचे क्रीडा प्रकार सादर केले जायचे. सैनिकांचा उत्साह वाढावा, स्फूर्ती रहावी म्हणून आपआपसात स्पर्धा होऊ लागल्या. सैनिक त्याने घेतलेल्या शिक्षणातील श्रेष्ठता, प्रतिष्ठित शस्त्रावरील प्रभुत्व, अंगातील चपळता अशा विविध कला गुणांचे प्रदर्शन करीत असत. सामान्य जनतेला युद्ध प्रसंगाची माहिती व्हावी व त्पांचे मनोरंजन व्हावे म्हणून सामुहिक तसेच द्वंद युद्धाची प्रात्याक्षिके दाखवली जायची. गुरू आपल्या शिष्यांमध्ये खिलाडुपणा, इर्षा इ. गुण निर्माण करण्यासाठी श्रेष्ठत्वाच्या स्पर्धा घेत असत. प्राचीन काळापासून अशा प्रकारे प्रात्यक्षिकांचे व स्पर्धाचे आयोजन होत असल्याचे अनेक दाखले रामायण, महाभारत आदि ग्रंथांतून तसेच बँबिलॉन, इजिप्त, चीन सारख्या देशातील प्राचीन इतिहासातून सापडतात. |