| हिंदूस्थानात आणि जगात विविध प्रकारचे क्रीडा प्रकार पहावयास मिळतात आणि या विविध क्रीडा प्रकारांचा इतिहासही तितकाच रंजक आहे. खेळ हा करमणुकीसाठी खेळला जातो त्याच्या अंतर्गतच स्पर्धा, उत्कर्ष या बाबींचा समावेश असतो. दोन किंवा दोहोपेक्षा जास्त लोक एकत्र येऊन खेळ खेळले जातात पण कला ही साधारणतः एकट्यापुरती मर्यादित असू शकते. एखाद्या कलेचे सामुदायिक प्रदर्शन किंवा प्रात्यक्षिक सादर केले जाते, त्यावेळी त्यास स्पर्धेचे स्वरूप प्राप्त होते. पण मुळात कला ही साधनेची समाधानाची, त्यागाची गोष्ट आहे जी व्यक्तिगत असते. मर्दानी खेळ ही मुळात कला आहे जी आत्मरक्षणाच्या उद्देशाने विकसित केली किंवा झाली. त्यामुळे शिकत असताना खेळ म्हणून नव्हे तर कला म्हणून आत्मसात करणे आवश्यक आहे. जेव्हा यात प्राविण्य मिळते तेव्हा त्याचे प्रदर्शन, प्रात्यक्षिक करावयाचे जे खेळ स्वरूपात असते.पूर्वी रणांगणात लढणार्या सैनिकांना तसेच राजा व इतर प्रतिष्ठित मान्यवरांच्या करमणुकीसाठी अनेक प्रकारचे क्रीडा प्रकार सादर केले जायचे. सैनिकांचा उत्साह वाढावा, स्फूर्ती रहावी म्हणून आपआपसात स्पर्धा होऊ लागल्या. सैनिक त्याने घेतलेल्या शिक्षणातील श्रेष्ठता, प्रतिष्ठित शस्त्रावरील प्रभुत्व, अंगातील चपळता अशा विविध कला गुणांचे प्रदर्शन करीत असत. सामान्य जनतेला युद्ध प्रसंगाची माहिती व्हावी व त्पांचे मनोरंजन व्हावे म्हणून सामुहिक तसेच द्वंद युद्धाची प्रात्याक्षिके दाखवली जायची. गुरू आपल्या शिष्यांमध्ये खिलाडुपणा, इर्षा इ. गुण निर्माण करण्यासाठी श्रेष्ठत्वाच्या स्पर्धा घेत असत. प्राचीन काळापासून अशा प्रकारे प्रात्यक्षिकांचे व स्पर्धाचे आयोजन होत असल्याचे अनेक दाखले रामायण, महाभारत आदि ग्रंथांतून तसेच बँबिलॉन, इजिप्त, चीन सारख्या देशातील प्राचीन इतिहासातून सापडतात. | | हिंदूस्थानात आणि जगात विविध प्रकारचे क्रीडा प्रकार पहावयास मिळतात आणि या विविध क्रीडा प्रकारांचा इतिहासही तितकाच रंजक आहे. खेळ हा करमणुकीसाठी खेळला जातो त्याच्या अंतर्गतच स्पर्धा, उत्कर्ष या बाबींचा समावेश असतो. दोन किंवा दोहोपेक्षा जास्त लोक एकत्र येऊन खेळ खेळले जातात पण कला ही साधारणतः एकट्यापुरती मर्यादित असू शकते. एखाद्या कलेचे सामुदायिक प्रदर्शन किंवा प्रात्यक्षिक सादर केले जाते, त्यावेळी त्यास स्पर्धेचे स्वरूप प्राप्त होते. पण मुळात कला ही साधनेची समाधानाची, त्यागाची गोष्ट आहे जी व्यक्तिगत असते. मर्दानी खेळ ही मुळात कला आहे जी आत्मरक्षणाच्या उद्देशाने विकसित केली किंवा झाली. त्यामुळे शिकत असताना खेळ म्हणून नव्हे तर कला म्हणून आत्मसात करणे आवश्यक आहे. जेव्हा यात प्राविण्य मिळते तेव्हा त्याचे प्रदर्शन, प्रात्यक्षिक करावयाचे जे खेळ स्वरूपात असते.पूर्वी रणांगणात लढणार्या सैनिकांना तसेच राजा व इतर प्रतिष्ठित मान्यवरांच्या करमणुकीसाठी अनेक प्रकारचे क्रीडा प्रकार सादर केले जायचे. सैनिकांचा उत्साह वाढावा, स्फूर्ती रहावी म्हणून आपआपसात स्पर्धा होऊ लागल्या. सैनिक त्याने घेतलेल्या शिक्षणातील श्रेष्ठता, प्रतिष्ठित शस्त्रावरील प्रभुत्व, अंगातील चपळता अशा विविध कला गुणांचे प्रदर्शन करीत असत. सामान्य जनतेला युद्ध प्रसंगाची माहिती व्हावी व त्पांचे मनोरंजन व्हावे म्हणून सामुहिक तसेच द्वंद युद्धाची प्रात्याक्षिके दाखवली जायची. गुरू आपल्या शिष्यांमध्ये खिलाडुपणा, इर्षा इ. गुण निर्माण करण्यासाठी श्रेष्ठत्वाच्या स्पर्धा घेत असत. प्राचीन काळापासून अशा प्रकारे प्रात्यक्षिकांचे व स्पर्धाचे आयोजन होत असल्याचे अनेक दाखले रामायण, महाभारत आदि ग्रंथांतून तसेच बँबिलॉन, इजिप्त, चीन सारख्या देशातील प्राचीन इतिहासातून सापडतात. |
| + | हिंदुस्थानात अनेक प्रातांत त्या त्या ठिकाणचे सास्कृतित, भोगोलिक, ऐतिहासिक व पारंपारिक महत्त्वास अनुसरून अनेक विविध कला क्रीडा प्रकार पहावपास मिळतात. अनेक ठिकाणी लोकनृत्यातून ही कला पहावयास मिळते. दक्षिणेकडे कलरीपप्यट, सिंतब, धांता- वारीसीई, नेडूवाडी तर आंध्रप्रदेशात कराडी अट्ट आसामकडे थांगथा, सौराष्ट्रात ढाल- लकडी, या व अशा अनेक नावानेही कला पहावयास मिळते. महाराष्ट्राचा विचार करता या देशाला खास अशी शौर्यशाली परंपरा लाभलेली आहे. दैदिप्पमान अशा छ. शिवाजी राजांचा कालखंड लाभलेला आहे. त्यांच्या इतिहासाची साक्ष म्हणून तसेच त्यांचा वारसा म्हणून अनेक ठिकाणी मर्दानी खेळ किंवा ताठी- दांडपट्टा या नावाने हा खेळ खेळला जातो. |
| + | आजच्या संगणकाच्या युगात या खेळाचा उपयोग काय असा अनेकांना प्रश्न पडणे साहजिक आहे. प्रत्येक देशाला संस्कृती आहे. प्रत्येक संस्कृतीला इतिहास आहे आणि या इतिहासावर आधारीतच वर्तमान आहे. आणि वर्तमानातूनच भविष्य ठरत असते आज जरी तलवारीचा काठीचा उपयोग लढाईत होत नसला तरी ही कला शिकताना अंगातील चपळता, उत्साह, चाणाक्षपणा, उत्स्फूर्तता, खिलाडूपणा, सहनशीलता पाचा विकास होत असतो केवळ आत्मरक्षण नव्हे तर शारीरिक वाढ, मानसिक वाढ, बौद्धिक प्रगल्भत : अशा अनेक गोष्टींसाठी तसेच मनुष्याचे जीवन हे अनेक प्रकारच्या घडामोडीने व्यापलेले असते. सुखदुःख, हार-जीत, चढ-उतार अशा अनेक प्रसंगाची रेलचेल त्याच्या जीवनात चालू असते आणि अशा समर प्रसंगातून जाताना त्याता तोंड द्यावयाचे म्हणजे मानसिक समतोल असणे गरजेचे असते त्याचे शरीर कंणखर असणे गरजेचे असते. मनातील अवास्तव भीती तसेच आत्मप्रौदी-अहंकार नाहिसा करण्यासाठी जीवनातील प्रसंगांना माघार न घेता सामोरे जाण्यासाठी, जीवन निरोगी सुखी समृद्ध करण्यासाठी, मनाच्या एकाग्रतेसाठी आणि मुख्य म्हणजे आपण आपली परंपरा आपली संस्कृती टीकवण्याचा केलेला प्रयत्न याच्या सार्थ अभिमानासाठी हा खेळ ही कला प्रत्येक स्त्री-पुरूषाने आत्मसात करावी. |
| + | आत्मरक्षणाच्या उद्देशातून निर्माण झालेली विविध आयुधे, या आयुधांचे गुरुकडे जाऊन शास्त्रोक्त पद्धतीने शिक्षण घेणे, त्या शिक्षणाचे, आत्मसात केलेल्या कलेचे व्यक्तिगत वा सांधिकरित्या सादरीकरण करणे, त्या त्या मिळवलेल्या शस्त्रास्त्रावरचे प्राविण्य प्रभुत्व लोकापुढे मांडणे तसेच आपले धारीष्ट्य, इ खवणे व त्यासाठी स्पर्धात्मक स्वरूपाचे प्रदर्शन करणे, कोणतीही कला, कोणतेही ज्ञान याच्या प्राप्तीसाठी गुरु असणे गरजेचे आहे. मेहनत कष्ट, चिकाटी, श्रद्धा, इच्छा, सहनशीलता हे गुण विद्यार्थ्यात असणे आवश्यक असते. युद्धाशी संबधित कला आपण शिकत असल्याने धाडस महत्त्वाचे असते. तालीम , आखाडा यामध्ये वस्ताद मंडळींच्या देखरेखीखाली या शस्त्रांचे प्रशिक्षण घेऊन,अंगमेहनत करून शरीर तयार करावे, वस्तांदाच्या नजरेखाली शरीर कमवल्यानंतर मर्दानी खेळाचा सराव करावा. बलवान व दमदार बनलेलत्या शरीर व मनाने ही कला अवगत करून देशकार्यास लावावी. |