शस्त्र चालवण्याच्या निरनिराळ्या तत्वांना सांकेतिकपणे एकत्रित करून त्यांची जी संथा आपण घेतो त्यास फेक करणे किंवा मारणे असे म्हणतात. साधारणतः फेकीचे दोन प्रकार पहावयास मिळतात. द्विमुखी (दुतोंडी) व चौमुखी (चौतोंडी), शस्त्र चालवण्याच्या मुलतत्वामध्ये हात मारणे, उतरणे, भोकसणे, वार, डंकी, डूंब, दाब, ऊलट, सुलट, उड्डाण, बैठक यांचा समावेश होतो. ही तत्वे विविधप्रकारे एकत्रितरित्या करणे म्हणजेच संथा घेणे व या संथा घेण्याच्या प्रकारास फेक असे म्हणतात.
+
+
=== सलामी ===
+
स्पर्धवेळी किंवा प्रात्यक्षिक दाखवतेवेळी आपल्या गुरुचा आशीर्वाद घेऊन मैदानात उतरणेची प्रथा फार पूर्वीपासून आहे. महाभारतातील युद्ध प्रसंगावेळी अर्जुनाने युद्धापूर्वी आपल्या गुरुची आज्ञा घेऊनच त्यांच्याशी युद्धात उभा राहिला होता. मान देणे, मुजरा, सलामी या अर्थाने मुख्य फेक करण्याआधी उपस्थित मान्यवरांकडून व प्रेक्षकांकडून त्यांचा आशीर्वाद आणि त्यांची दाद घेण्यासाठी करावयाच्या मुख्य फेकीपूर्वी एखादी संथा घेणे यास सलामी किंवा मुजरा असे म्हणतात. यानंतर आपण मुख्य फेक द्विमुखी किंवा चौमुखी करीत असतो. इंग्रजीमधील एका वाक्प्रचारानुसार ‘फस्ट इंप्रेशन इज लास्ट इंप्रेशन' तद्वतच मैदानात उतरल्यानंतर खेळाडूचा दम, चपळता, धिटाई, दमदारपणा, चापल्य या साऱ्या गुणांची पारख सलामीच्या त्याच्या एकूण भावाविष्कारातून दिसून येते.