| | स्पर्धवेळी किंवा प्रात्यक्षिक दाखवतेवेळी आपल्या गुरुचा आशीर्वाद घेऊन मैदानात उतरणेची प्रथा फार पूर्वीपासून आहे. महाभारतातील युद्ध प्रसंगावेळी अर्जुनाने युद्धापूर्वी आपल्या गुरुची आज्ञा घेऊनच त्यांच्याशी युद्धात उभा राहिला होता. मान देणे, मुजरा, सलामी या अर्थाने मुख्य फेक करण्याआधी उपस्थित मान्यवरांकडून व प्रेक्षकांकडून त्यांचा आशीर्वाद आणि त्यांची दाद घेण्यासाठी करावयाच्या मुख्य फेकीपूर्वी एखादी संथा घेणे यास सलामी किंवा मुजरा असे म्हणतात. यानंतर आपण मुख्य फेक द्विमुखी किंवा चौमुखी करीत असतो. इंग्रजीमधील एका वाक्प्रचारानुसार ‘फस्ट इंप्रेशन इज लास्ट इंप्रेशन' तद्वतच मैदानात उतरल्यानंतर खेळाडूचा दम, चपळता, धिटाई, दमदारपणा, चापल्य या साऱ्या गुणांची पारख सलामीच्या त्याच्या एकूण भावाविष्कारातून दिसून येते. | | स्पर्धवेळी किंवा प्रात्यक्षिक दाखवतेवेळी आपल्या गुरुचा आशीर्वाद घेऊन मैदानात उतरणेची प्रथा फार पूर्वीपासून आहे. महाभारतातील युद्ध प्रसंगावेळी अर्जुनाने युद्धापूर्वी आपल्या गुरुची आज्ञा घेऊनच त्यांच्याशी युद्धात उभा राहिला होता. मान देणे, मुजरा, सलामी या अर्थाने मुख्य फेक करण्याआधी उपस्थित मान्यवरांकडून व प्रेक्षकांकडून त्यांचा आशीर्वाद आणि त्यांची दाद घेण्यासाठी करावयाच्या मुख्य फेकीपूर्वी एखादी संथा घेणे यास सलामी किंवा मुजरा असे म्हणतात. यानंतर आपण मुख्य फेक द्विमुखी किंवा चौमुखी करीत असतो. इंग्रजीमधील एका वाक्प्रचारानुसार ‘फस्ट इंप्रेशन इज लास्ट इंप्रेशन' तद्वतच मैदानात उतरल्यानंतर खेळाडूचा दम, चपळता, धिटाई, दमदारपणा, चापल्य या साऱ्या गुणांची पारख सलामीच्या त्याच्या एकूण भावाविष्कारातून दिसून येते. |
| | + | शत्रूस नेस्तनाबूत करणे, जायबंद करणे, ठार मारणे, घायाळ करणे, यासाठी त्याच्या शरीराच्या विविध अवयवांवर जे शस्त्राने आघात आपण करतो ते आघात म्हणजे 'वार' या दृष्टीने पहाता शरीराचे एकूण चार भागात विभाजन केले जाते. टाळूपासून खांद्यापर्यंतचा भाग, खांदा ते कंबरेपर्यंतचा भाग, कंबर ते पायापर्यंतचा भाग व हात असे चार विभागात शिर, कंबर, किंवा बगल, तगडी किंवा पाय व हात अशा सांकेतिक शब्दामध्ये वार घेतले जातात. हे मुख्य चार विभाग असले तरी वाराचे अनेक पोट प्रकार असल्याचे आढळतात. शिर, बगल, गर्दन, तमाचा, बहेरा, हसळी, मुंढा, (मेढा) जनेऊ उलटा-सुतटा, चीर, खोच, कंबर, कोटा, पोटरी, कडक, पालट, हात कलम, सीना. |