मर्दानी खेळ - खेळातील आयुधे

From Dharmawiki
Revision as of 10:48, 14 June 2021 by Sunilv (talk | contribs) (→‎मायीक: लेख संपादित केल)
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to navigation Jump to search

मायीक

सांधारण आकार, शब्द वगैरेच्या सहाय्याने ज्याच्या शक्तीचा आगाऊ अंदाज करता येतो ते आयुध म्हणजे मायीक अस्त्र.

निर्माय

ज्याच्या शक्तीचा आगाऊ अंदाज करता येत नाही म्हणजेच जे इंद्रियगोचर आहे ते अस्त्र म्हणजे निर्माय.मारणे, जायबंद करणे इत्यादीसाठी शस्त्रास्त्रांचा उपयोग केला जातो, त्याचबरोबर या शस्त्रास्त्रापासून व शत्रूपासून संरक्षणही होणे गरजेचे असते. त्यामुळे रक्षणात्मक साधनांची झालेली निर्मिती ही या आयुधामध्येच समाविष्ट केली पाहिजे उदा. ढाल, शिरस्त्राण, शरीर अवयवांची रक्षण करणारी विविध कवच इ.

कापणारी, चुरकरणारी, शरीरात घुसणारी, दुरुन शरीरात घुसणारी, दुरुन फेकून विध्वंस करणारी अशा विविध हेतूने कार्य साधणारी आयुधे त्यांच्या आकारादि वैशिष्ट्यानुसार अनेक नावाने ओळखती जातात. वेदांत- पट्टीश, भल्ल, वज, परशू, गोशिरस, असियष्टी, अस्तार, कूंत, प्रास, पिनाक, गदा, मुदगल, मुसल, मुष्टिका, शतग्नी, खड्ग, चक्र, पाश, तोमर इ. अनेक नावस्वरूप आयुधे आढळतात. प्रांतोप्रांतीच्या भाषेनुरूप शस्त्रास्त्रांत विविध नावे दिलेली आढळतात. महाराष्ट्र देशीचा विचार करता काठी (दंड) बाणा, विटा, पट्टा, भाला, फरशी, माडू. गुर्ज, जंबिया, तलवार, जबरदंड, बोधाटी, तीरकमान, बिचवा, सांग, फरसा, गोफण, फणा, धारीया, कट्यार, सूरी, विळा, इ. अनेकविध प्रकारची आयूधे पहावयास मिळतात. तसेच खेळ खेळताना सराव करताना जे शब्द वापरते जातात. त्यामध्ये हात मारणे किंवा करणे, सलामी, फेक, लढत, पवित्रा, दाब भरणे, डुब, डंकी मारणे, पटकापकरणे, हे व असे इतर बोली शब्द वापरलेले दिसतात.

हात

शत्रूस मारणे, जायबंद करणे, निपचित पाडणे या मुख्य हेतू साध्यासाठी शस्त्रांचा आधात करणे. या आघात करण्याच्या उतट व सुलट क्रियेस हात करणे म्हणतात किंवा विशिष्ट पद्धतीने जाणीवपूर्वक योग्य ठिकाणी केलेला वार आघात यास हात मारणे असे म्हणतात. तर वार पुन्हा मारता यावा म्हणून शस्त्राचा हात मुळ स्थितीत पुन्हा आणण्याच्या क्रियेस हात उतरणे असे म्हणतात.

पवित्रा

खेळाच्या मूलतत्वामध्ये आक्रमण व बचाव हे मुख्य हेतू असत्याने या मूलतत्वामध्ये 'पवित्रा' यास खुप महत्त्व आहे. एखादी वास्तू, इमारत उभी करताना तिचा पाया भक्कम असणे गरजेचे असते आणि वास्तू जितकी भव्य असेल, वैशिष्ट्यपूर्ण असेल त्या स्वरूपात पायाची भक्कमता किंवा योग्यता ठरवतो गेली असते. आपण ज्या कलेची खेळाची ओळख करून घेत आहोत, त्यात पवित्रा म्हणून ज्याचा महत्त्वपूर्ण निर्देश आलेला आहे तो पवित्रा 'पाया' या संकल्पनेस आधारभूत आहे. आक्रमण व बचाव ही दोन मुलभूत तत्वे मुख्य असल्याने यावर आधारित पवित्र्याची बैठक असते. पवित्र या शब्दापासून पवित्रा हा शब्द प्रयोगरूढ झाला असल्याची शक्यता आहे . कारण पवित्र म्हणजे शुद्ध साधारणत: अनुकूल प्रतिकूल परिस्थितीमध्ये जी प्राण्यांची हालचाल होत असते त्यावेळी विशुद्ध असा स्थितीमध्ये किंवा दोषरहित शारीरिक हालचाली करून तसेच हेतुपुरस्सर भावमुद्रेमध्ये उभे रहाणे, या ज्या स्वाभाविक क्रिया घडत असतात त्यास पवित्रा घेणे किंवा पवित्र्यात रहाणे असे म्हटले जाते. अनुकरण करणे हा मानवाचा उपजत गुण आहे. आजूबाजूला घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्यातून मनुष्य काहीना काही शिकत आला आहे. एखादा प्राणी ज्यावेळी आक्रमण करतो त्यावेळी, तसेच तो बचाव करतो त्यावेळी, त्याच्या ज्या हालचाली असतात त्याचे निरीक्षण करून मानवाने आपल्या जीवनात त्याचा उपयोग केला. पायाच्या खुराने जमिन उकरणे, दात विचकणे, आवाज काढणे, हाताच्या पंजाची नखे दाखवणे, पिसे, केस ताठ करणे, शरीराचा विशिष्ट अवयव हा भाग लपवणे या व अशा अनेक हतचाली प्राणी पक्षी संरक्षणाच्यावेळी करीत असतात. या साऱ्या भावमुद्रा पवित्रा' या सदरात मोडतात. उजव्या हातात शस्त्र धरले असेल व सावधतेच्या पवित्र्यामध्ये उभे रहायचे असल्यास डावा पाय पुढे व उजवा पाय मागे ठेवून उभे रहावे, तर आघात करताना उजवा पाय पुढे व डावा पाय मागे ठेवून उभे रहावे. एकंदर सर्व गोष्टींचा विचार करून काही पवित्रे बसवलेले दिसतात. अलिढ, प्रत्यालिढ, नरसिंह, स्वस्तिक, गरुड, हनुमंती, प्रेरित इ.

अलिढ

डावा पाय पुढे गुडघ्यामध्ये वाकवलेला असावा. तर उजवा पाय सरळ ताठ मागे ठेवावा. दोन्ही पायाच्या दरम्यान दोन ते अडीच फूट अंतर असावे. नजर छाती समोर असावी. पाठीचा कणा ताठ असावा. शरीराचा भार मागील उजव्या पायावर ठेवून असावे. दोन्ही पायाच्या टाचा जमिनीवर टेकवलेल्या असाव्यात.

अलिढ़.jpg

प्रत्यालिढ

डावा पाय सरळ गुडघ्यात न वाकवता पुढे ठेवाता व उजवा पाय गुड्यात वाकवलेता मागे ठेवावा शरीराचा सारा भार उजव्या पायावर ठेवावा शरीर किचीत उजव्या पायाकडे जमिनीकडे झकतेते असावे

Prtyalidh 1.jpg

नरसिंह

दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवतेले. समातर रेषेत दोन्ही पायामध्ये दोन ते अडीच फूट अतर घ्यावे शरीराचा भार दोन्ही पायावर समान ठेवावा सावजावर आक्रमण करताना वाघ- सिंहाच्या स्थितीप्रमाणे शरीर तकबित रहावे.

Narhinh.jpg

हनुमंती

डाव्या पायावर बैठक घ्यावी उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर टेकवावा. वीर हनुमानाची अढळता आठवावी.

WhatsApp Image 2021-06-03 at 19.02.35.jpg

गरुड

डाव्या पायावर बैठक घ्यावी उजवा पाय मागे लांब घेऊन गुडघा जमिनीस टेकवावा उजव्या व डाव्या पायाच्या चंप्यावर भर देऊन असावे.

WhatsApp Image 2021-06-04 at 13.33.48.jpg
फेक.jpg
द्विमुखी फेक.jpg

फेक

शस्त्र चालवण्याच्या निरनिराळ्या तत्वांना सांकेतिकपणे एकत्रित करून त्यांची जी संथा आपण घेतो त्यास फेक करणे किंवा मारणे असे म्हणतात. साधारणतः फेकीचे दोन प्रकार पहावयास मिळतात. द्विमुखी (दुतोंडी) व चौमुखी (चौतोंडी), शस्त्र चालवण्याच्या मुलतत्वामध्ये हात मारणे, उतरणे, भोकसणे, वार, डंकी, डूंब, दाब, ऊलट, सुलट, उड्डाण, बैठक यांचा समावेश होतो. ही तत्वे विविधप्रकारे एकत्रितरित्या करणे म्हणजेच संथा घेणे व या संथा घेण्याच्या प्रकारास फेक असे म्हणतात.

सलामी

स्पर्धवेळी किंवा प्रात्यक्षिक दाखवतेवेळी आपल्या गुरुचा आशीर्वाद घेऊन मैदानात उतरणेची प्रथा फार पूर्वीपासून आहे. महाभारतातील युद्ध प्रसंगावेळी अर्जुनाने युद्धापूर्वी आपल्या गुरुची आज्ञा घेऊनच त्यांच्याशी युद्धात उभा राहिला होता. मान देणे, मुजरा, सलामी या अर्थाने मुख्य फेक करण्याआधी उपस्थित मान्यवरांकडून व प्रेक्षकांकडून त्यांचा आशीर्वाद आणि त्यांची दाद घेण्यासाठी करावयाच्या मुख्य फेकीपूर्वी एखादी संथा घेणे यास सलामी किंवा मुजरा असे म्हणतात. यानंतर आपण मुख्य फेक द्विमुखी किंवा चौमुखी करीत असतो. इंग्रजीमधील एका वाक्प्रचारानुसार ‘फस्ट इंप्रेशन इज लास्ट इंप्रेशन' तद्वतच मैदानात उतरल्यानंतर खेळाडूचा दम, चपळता, धिटाई, दमदारपणा, चापल्य या साऱ्या गुणांची पारख सलामीच्या त्याच्या एकूण भावाविष्कारातून दिसून येते.

फेक चौमुखी.jpg

वार

शत्रूस नेस्तनाबूत करणे, जायबंद करणे, ठार मारणे, घायाळ करणे, यासाठी त्याच्या शरीराच्या विविध अवयवांवर जे शस्त्राने आघात आपण करतो ते आघात म्हणजे 'वार' या दृष्टीने पहाता शरीराचे एकूण चार भागात विभाजन केले जाते. टाळूपासून खांद्यापर्यंतचा भाग, खांदा ते कंबरेपर्यंतचा भाग, कंबर ते पायापर्यंतचा भाग व हात असे चार विभागात शिर, कंबर, किंवा बगल, तगडी किंवा पाय व हात अशा सांकेतिक शब्दामध्ये वार घेतले जातात. हे मुख्य चार विभाग असले तरी वाराचे अनेक पोट प्रकार असल्याचे आढळतात. शिर, बगल, गर्दन, तमाचा, बहेरा, हसळी, मुंढा, (मेढा) जनेऊ उलटा-सुतटा, चीर, खोच, कंबर, कोटा, पोटरी, कडक, पालट, हात कलम, सीना.