Difference between revisions of "काठी"

From Dharmawiki
Jump to navigation Jump to search
m (Sunilv moved page काठी - मर्दानी खेळ to काठी over redirect)
 
(3 intermediate revisions by the same user not shown)
(No difference)

Latest revision as of 10:39, 14 June 2021

सहज उपलब्ध होणारी व बहुकामी असणारी काठी नीती शास्त्राचे प्रतिक देखील आहे. वैदिक ग्रंथामध्ये दांडा, सोटा अशा अर्थाने याचा उल्लेख सापडतो महाभारत रामायण काळात लोह यष्टी मुसलयष्टी अशी नावे सापडतात शस्त्र म्हणून पाकडे पहाता अगदी आदीमानव काळामध्ये आपणास जावे लागेल. आदिम काळामध्ये मानवाने स्वरक्षणासाठी व शिकारीसाठी ज्या काही शस्त्रास्त्राचा उपयोग केला होता त्यामध्ये दण्ड शस्त्राचा आवर्जून उल्लेख करावा लागेल

आयुध शास्त्रानुसार काठी हे अमुक्त प्रकारातील शस्त्र आहे महाभारतात बलरामाने मुसळयष्टी शस्त्र म्हणून धारण केले होते त्याने हे शस्त्र चालवण्याचे काही नियम व प्रकार सांगितले आहेत तेच नियम व प्रकार काठीस ही लागू पडतात. काठी चालवण्याचे एकूण सत्तीवीस हात दिले असून यामध्ये लाठी चालवणारा दोन्ही हाताचा उपयोग करत असल्याने त्यास सव्यसाची म्हटले जाते. दंड कोणी धारण करावा व त्याचे स्वरूप कसे असावे याचे देखील काही नियम आहेत. ब्रह्मचाराने धारण करावयाचा दंड हा खैराच्या झाडाचा किंवा उत्तम जातीच्या बांबूचा भरीव असा जवळ जवळ पेर असणारा व विषम पेर संख्याचा असावा. याची उंची धारण करणान्याच्या कानाच्या पाळी इतकी असावी. विद्यध्ययन काळा संरक्षणासाठी अन्यायाविरूद्ध उपयोगासाठी याचा उपयोग करावा संन्यासाने जो दंड धारण करावयाचा असतो त्याची उंची कमी असते व तो इंद्रीय दमनाचे प्रतिक म्हणून जवळ बाळगावयाचा असतो तर राजाने शत्रूवरील विजयाचे प्रतिक, अभयदानाचे प्रतिक, न्याय दानाचे प्रतिक म्हणून राजदंड धारणकरायचा असतो. उपनयनविधी, राज्याभिषेक विधी, इतर धार्मीक विधी करताना दंड धारण करण्याची प्रथा आहे आणि अशा विविध कारणामुळेच दंडनीती हा शब्द रूढ झाला असावा.

वसिष्ठांनी दोन अंगूले जाड व चार हात लांब असे प्रमाण दंडाचे दिले आहे तर मनूने खालीलप्रमाणे दंडाचे वर्णन केले आहे.

ऋजवस्ते तु सर्वे स्युरव्रणा:सौम्पदर्शनाः॥ अनुवैगकरा नृणां स त्वचोडनाग्निदुषिताः॥

वरील श्लोक हा ब्रह्मचाऱ्यानी धरावयाच्या दंडाबद्दल आहे. शस्त्र म्हणून जेव्हा दंड वापरू तेव्हा स्वरक्षण व शत्रूवर आघात असे सरळ तत्व लक्षात ठेवले पाहिजे. साधारणतः मस्तक, बगल, कानशिल, पोटरी, कमर अशा शरिराच्या अवयवांवर काठीचे प्रहार केले जातात.

करेणादाय लगुडं दक्षिणाङ्गुलकं नवम्। उद्यम्य पातयेत् तेन नाशस्तंस्य रिपोर्दुदः।।

उभाभ्यामथ हस्ताभ्यां कुर्यात्तस्य निपातनम्। अक्लेशेन हि तत् कुर्वन वधे सिद्धिमवाप्तुयात्॥

अर्थ- उजव्या हातात नवी दणकट काठी घेऊन तो वर उचलून शत्रूला मारावी म्हणजे त्याचा घात होतो. दोन्ही हातानी त्याला खाली पाडावे सहजतेने हे करणारा शत्रूचा वध करण्याच्या बाबतीत सिद्धी प्राप्त करून घेतो बहुकामी व सहज उपलब्ध होणारी असली तरी ती चालविण्याचा नियमित सराव होणे गरजेचे असते जेणेकरून योग्यवेळी तिचा उपयोग करता येऊ शकतो.

हा दंड कसा चालवावा किवा तो शस्त्र म्हणून कसा वापरला जातो यासंबंधी प्रत्येक प्रांतात ज्या त्या संप्रदायामध्ये वेगवेगळी पद्धत असल्यामुळे विविध मत प्रवाह पहावयास मिळतात तेव्हा शव म्हणून काठीचे कार्य कशा स्वरूपाचे आहे, हे महत्त्वाचे ठरते. कित्येक ठिकाणी काठी तिच्या मध्यभागी पकडली जाते तर कित्येक ठिकाणी ती काठीच्या एका टोकास धरली जाते. काठी धरताना कोणी उजवा हाल वर डावा हात खाली धरतात तर काही ठिकाणी याच्या विरूद्ध पद्धतीने धरतात. तसे पहाता उजवा हात वर असणे योग्य वाटते. तसेच काठी शेंड्याकडून न धरता बुडाकडून धरावे व बुढापाशी कोपर धरून हाताची मूठ जिथे येईल तिथे काठी पकडावी.

काठी फिरवणे व काठी परजणे असे दोन प्रकार असतात. आपण काठी जरी दोन्ही हाताने धरली असे वाटत असले तरी मुळात आपण एका हातानेच काठी फिरवत असतो. मात्र काठी परजताना म्हणाले काठी आघात करताना दोन्ही हातांची पकड घट्ट करून मारत असतो. काठी फिरवताना काठी आपल्या शरीराच्या ज्या बाजूने काठी वरून खाली किंवा खालून वर घेत असतो त्या बाजूच्या हाताची मुठ ढीली करावी. कोणत्याही वस्तूला गती प्राप्त झाली असता तिचे वजन गतीत रूपांतरीत होत असते अशाच प्रकारे वजनदार काठी फिरवत असताना हलकी झालेली असते.आपण जेव्हा वार मारतो त्यावेळी आघातानंतर प्रति हादरा आपल्या हाताच्या मनगटावर येत असल्याने मनगट दुखावण्याची शक्यता असते तेव्हा वार मारण्याचा चांगला सराव करावा व वार मारताना काठी दोन्ही हातांनी घट्ट पकडावी.

WhatsApp Image 2021-06-10 at 18.21.29.jpg