Difference between revisions of "भारतीय खेळ"
m (→खेळातील आयुधे) |
(→मायीक: नवीन ल;एख बनवलं) |
||
Line 35: | Line 35: | ||
=== मायीक === | === मायीक === | ||
− | + | '''विस्तृत [[मर्दानी खेळ - खेळातील आयुधे|माहिती]] साठी इथे वाचा .''' | |
=== निर्माय === | === निर्माय === | ||
− | + | '''विस्तृत [[मर्दानी खेळ - खेळातील आयुधे|माहिती]] साठी इथे वाचा''' . | |
− | |||
− | |||
=== हात === | === हात === | ||
− | + | '''विस्तृत [[मर्दानी खेळ - खेळातील आयुधे|माहिती]] साठी इथे वाचा .''' | |
=== पवित्रा === | === पवित्रा === | ||
− | + | '''विस्तृत [[मर्दानी खेळ - खेळातील आयुधे|माहिती]] साठी इथे वाचा .''' | |
=== अलिढ === | === अलिढ === | ||
− | + | '''विस्तृत [[मर्दानी खेळ - खेळातील आयुधे|माहिती]] साठी इथे वाचा .''' | |
− | [[ | ||
=== प्रत्यालिढ === | === प्रत्यालिढ === | ||
− | + | '''विस्तृत [[मर्दानी खेळ - खेळातील आयुधे|माहिती]] साठी इथे वाचा .''' | |
− | [[ | ||
− | |||
=== नरसिंह === | === नरसिंह === | ||
− | + | '''विस्तृत [[मर्दानी खेळ - खेळातील आयुधे|माहिती]] साठी इथे वाचा .''' | |
− | [[ | ||
=== हनुमंती === | === हनुमंती === | ||
− | + | '''विस्तृत [[मर्दानी खेळ - खेळातील आयुधे|माहिती]] साठी इथे वाचा .''' | |
− | [[ | ||
− | |||
=== गरुड === | === गरुड === | ||
− | + | '''विस्तृत [[मर्दानी खेळ - खेळातील आयुधे|माहिती]] साठी इथे वाचा .''' | |
− | [[ | ||
− | |||
− | |||
− | |||
=== फेक === | === फेक === | ||
− | + | '''विस्तृत [[मर्दानी खेळ - खेळातील आयुधे|माहिती]] साठी इथे वाचा .''' | |
=== सलामी === | === सलामी === | ||
− | + | '''विस्तृत [[मर्दानी खेळ - खेळातील आयुधे|माहिती]] साठी इथे वाचा .''' | |
− | [[ | ||
=== वार === | === वार === | ||
− | + | '''विस्तृत [[मर्दानी खेळ - खेळातील आयुधे|माहिती]] साठी इथे वाचा .''' |
Revision as of 14:55, 7 June 2021
भारतीय खेळांचे भरपूर प्रकार आहे त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे " मर्दानी खेळ ".
मर्दानी खेळ
प्रस्तावना
मर्दानी खेळाबाबतचा विषय निधाला की, आपल्या डोळ्यासमोर " श्री छत्रपती शिवाजीमहाराज" आणि त्यांच्या स्वराज्य स्थापनेवेळची परिस्थिती प्रसंग व त्यांची युद्धकला उभी राहते. "मर्दानी खेळ" म्हणजे युद्ध, लढाई, मारामारी इ. प्रसंग आपल्या डोळ्यासमोर येतात. जगात युद्धासाठी आधुनिक शस्त्रे उदा. बॉब, रणगाडे, बंदुका, तोफा, विमाने, वापरती जातात. आणि अशा परिस्थितीत आपण "ढाल-ततवार", भाला, इ. शिवकालीन शस्त्राबद्दल आणि खेळाबद्दल माहिती घेणार आहोत. याठिकाणी थोडी विसंगती वाटेल. जग "चंद्रा" वर चाललयं आणि आपण ढाल तलवार घेऊन बसतो, म्हणून लोक आपली चेष्टा करणार. यात नवे काही नाही. लोक म्हणतीत मर्दानी खेळ इतिहासात जमा झाला आहे. म्हणू देत, पण त्याचबरोबर त्यांना हे माहित नसावे की, सध्याच्या वर्तमान काळातदेखीत मर्दानी खेळातील शस्त्रेच आपले संरक्षण करणार आहेत. कोणत्याही देशाच्या युद्धात बंदुका, बाँब, विमाने यांचाच उपयोग केला जातो. पण हातघाईची लढाई जुंपते तेव्हा आपला "जीव" वाचवायचा असेल तर, आपल्याजवळ खंजिर, तलवार, भाला, गुप्ती इ. सारखे हत्यार असेल तरच शत्रुपासून आपला बचाव करू शकणार, म्हणून ज्यावेळी "युद्धे" होतात. त्यावेळी वरीलपैकी शस्त्रे सैनिकांकडे आवरजून असतातच. यावरून आपत्याता कळून येईल की, मानवाने युद्धामध्ये कितीही अत्याधुनिक शस्त्रे वापरली तरी, शेवटी पूर्वीची तलवार, खंजिर, गुप्ती, इ. सारखी शस्त्रे कालबाह्य म्हणता येणार नाहीत. "मर्दानी खेळ" म्हणजेच इतिहासकालीन लढाईचे प्रशिक्षण होय. लढाई करणे म्हणजे साधीसुधी गोष्ट नव्हे, तसेच सामान्य माणसाचेही काम नव्हे. लढाई करणे हे मर्दाचिच काम, म्हणूनच या जुन्या लढाईच्या खेळाला "मर्दानी खेळ" असे नाव दिले आहे. आपणास कोठे लढाई अगर युद्ध करावयास जावयाचे नाही. परंतु आपले स्वतःचे संरक्षण तरी आपण करावयास पाहिजे ना ।
जर आपले संरक्षण आपण स्वतःच करावयाचे असेल तर प्रत्येकाने 'मर्दानी खेळ शिकलेच पाहिजे अशी अपेक्षा "मर्दानी खेळ" हा व्यायामाचा भाग सुद्धा होऊ शकतो. या खेळामुळे आपला आत्मविश्वास वादतो, शिवाय शरीर पण लवचिक राहते. धाडस वाढले जाऊन मानसिक संतुलनसुद्धा राखले जाते. आजची आपती दैनंदिन परिस्थिती पाहिली तर आपल्या घरातही आपण सुरक्षित नाही अशी भावना सर्व लोकांत आढळून येते. सध्या याच कारणासाठी आपणही जुनी युद्धकला आत्मसात करण्याची गरज आहे. या खेळामुळे आत्मविश्वासाबरोबरच धाडस सुद्धा वाढते आणि धाडसामुळे महत्त्वाकांक्षा तयार होते. महत्त्वाकांक्षा तयार झाली की, कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्या धाडशी वृत्तीमुळे आपण मुसंडी मारतो. अर्थातच आपण विजयाच्या दिशेने वाटचाल करू लागतो. जीवनात अनेक प्रकारची संकटे येतात-जातात. येणाऱ्या संकटांना, मग ती कोणतीही असोत, उदा. आर्थिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक इ. त्यांना सामोरे जाऊन ती नेस्तनाबूत करण्याची ताकद आपल्याता मर्दानी खेळाच्या माध्यमातून मिळू शकते. असा माझा स्वत:चा अनुभव आहे. "मर्दानी खेळात" सुद्धा मानसशास्त्र आहे. खेळ कोणताही असो, प्रत्येक खेळाडू हा त्या खेळातील विजयश्री खेचून आणण्यासाठी प्रयत्न करीत असतो. आणि तोच खेळाडू खेळातील विजयश्रीप्रमाणेच आपल्या जीवनात येणाऱ्या स्पर्धांमध्ये विजयश्री खेचून आणतो. खेळाचा मनावर देखील परिणाम होत असतो. आपल्या व्यवसायात, नोकरीत, शिक्षणात तसेच येईल त्या प्रसंगाता सामोरे जाण्याची शक्ती येते.
विषय प्रवेश
खेळाचा इतिहास
इतिहास पहायचा झाल्यास आपणास मानवाच्या अगदी प्रारंभ काळापासूनचा कालखंड लक्षात घ्यावयास हवा जेव्हा मानवाची उत्क्रांती होत होती तेव्हा मनुष्य एक जंगली प्राणी होता इतर प्राण्यांप्रमाणेच त्याचे राहणीमान असायचे, जगण्यासाठीची धडपड करावी लागायची. जंगली प्राण्यापासून स्वरक्षणांसाठी आवाजांचा, नखांचा, दातांचा उपयोग करावा लागत असे. हातांच्या मुठीमध्ये धरता येण्याजोग्या दगडांच्या कपारीचा उपयोग त्याने अश्मयुगांत केला. पुढे झाडांच्या फांद्याचा उपयोग केला. धातूच्या शोधामुळे अनेक सोप्या पद्धतीचा वापर त्याने आपल्या जीवनात केला. पहिल्यापहिल्यांदा फक्त स्वरक्षणासाठी मारणे या उद्देशापुरताच याचा उपयोग होत होता. मात्र नंतरच्या काळात त्याला विशिष्ट शास्त्र निर्माण झाले विविध आयुधांमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने बदल करून ते योग्यरितीने कसे हाताळायचे याचे नियम व धडे दिले गेले. यातूनच जगाच्या कानाकोपऱ्यात विविध प्रकारचे आत्मरक्षणाचे कलाप्रकार अस्तित्वात आले मल्जविद्या, कुंगफु, जुजुत्स्तु, कराटे ज्युदो, या व अशा अनेक कला क्रीडा प्रकार निर्माण झाले. आजच्या युगात जरी हे खेळ प्रकार म्हणून आपण पहात असलो तरी हे मुळात आत्मरक्षणाची कला या मुलभूत तत्वातूनच निर्माण झालेले शास्त्र आहे.
खेळ ची कला
हिंदूस्थानात आणि जगात विविध प्रकारचे क्रीडा प्रकार पहावयास मिळतात आणि या विविध क्रीडा प्रकारांचा इतिहासही तितकाच रंजक आहे. खेळ हा करमणुकीसाठी खेळला जातो त्याच्या अंतर्गतच स्पर्धा, उत्कर्ष या बाबींचा समावेश असतो. दोन किंवा दोहोपेक्षा जास्त लोक एकत्र येऊन खेळ खेळले जातात पण कला ही साधारणतः एकट्यापुरती मर्यादित असू शकते. एखाद्या कलेचे सामुदायिक प्रदर्शन किंवा प्रात्यक्षिक सादर केले जाते, त्यावेळी त्यास स्पर्धेचे स्वरूप प्राप्त होते. पण मुळात कला ही साधनेची समाधानाची, त्यागाची गोष्ट आहे जी व्यक्तिगत असते. मर्दानी खेळ ही मुळात कला आहे जी आत्मरक्षणाच्या उद्देशाने विकसित केली किंवा झाली. त्यामुळे शिकत असताना खेळ म्हणून नव्हे तर कला म्हणून आत्मसात करणे आवश्यक आहे. जेव्हा यात प्राविण्य मिळते तेव्हा त्याचे प्रदर्शन, प्रात्यक्षिक करावयाचे जे खेळ स्वरूपात असते.पूर्वी रणांगणात लढणार्या सैनिकांना तसेच राजा व इतर प्रतिष्ठित मान्यवरांच्या करमणुकीसाठी अनेक प्रकारचे क्रीडा प्रकार सादर केले जायचे. सैनिकांचा उत्साह वाढावा, स्फूर्ती रहावी म्हणून आपआपसात स्पर्धा होऊ लागल्या. सैनिक त्याने घेतलेल्या शिक्षणातील श्रेष्ठता, प्रतिष्ठित शस्त्रावरील प्रभुत्व, अंगातील चपळता अशा विविध कला गुणांचे प्रदर्शन करीत असत. सामान्य जनतेला युद्ध प्रसंगाची माहिती व्हावी व त्पांचे मनोरंजन व्हावे म्हणून सामुहिक तसेच द्वंद युद्धाची प्रात्याक्षिके दाखवली जायची. गुरू आपल्या शिष्यांमध्ये खिलाडुपणा, इर्षा इ. गुण निर्माण करण्यासाठी श्रेष्ठत्वाच्या स्पर्धा घेत असत. प्राचीन काळापासून अशा प्रकारे प्रात्यक्षिकांचे व स्पर्धाचे आयोजन होत असल्याचे अनेक दाखले रामायण, महाभारत आदि ग्रंथांतून तसेच बँबिलॉन, इजिप्त, चीन सारख्या देशातील प्राचीन इतिहासातून सापडतात.
हिंदुस्थानात अनेक प्रातांत त्या त्या ठिकाणचे सास्कृतित, भोगोलिक, ऐतिहासिक व पारंपारिक महत्त्वास अनुसरून अनेक विविध कला क्रीडा प्रकार पहावपास मिळतात. अनेक ठिकाणी लोकनृत्यातून ही कला पहावयास मिळते. दक्षिणेकडे कलरीपप्यट, सिंतब, धांता- वारीसीई, नेडूवाडी तर आंध्रप्रदेशात कराडी अट्ट आसामकडे थांगथा, सौराष्ट्रात ढाल- लकडी, या व अशा अनेक नावानेही कला पहावयास मिळते. महाराष्ट्राचा विचार करता या देशाला खास अशी शौर्यशाली परंपरा लाभलेली आहे. दैदिप्पमान अशा छ. शिवाजी राजांचा कालखंड लाभलेला आहे. त्यांच्या इतिहासाची साक्ष म्हणून तसेच त्यांचा वारसा म्हणून अनेक ठिकाणी मर्दानी खेळ किंवा ताठी- दांडपट्टा या नावाने हा खेळ खेळला जातो.
खेळाचे महत्त्व, उद्देश
आजच्या संगणकाच्या युगात या खेळाचा उपयोग काय असा अनेकांना प्रश्न पडणे साहजिक आहे. प्रत्येक देशाला संस्कृती आहे. प्रत्येक संस्कृतीला इतिहास आहे आणि या इतिहासावर आधारीतच वर्तमान आहे. आणि वर्तमानातूनच भविष्य ठरत असते आज जरी तलवारीचा काठीचा उपयोग लढाईत होत नसला तरी ही कला शिकताना अंगातील चपळता, उत्साह, चाणाक्षपणा, उत्स्फूर्तता, खिलाडूपणा, सहनशीलता पाचा विकास होत असतो केवळ आत्मरक्षण नव्हे तर शारीरिक वाढ, मानसिक वाढ, बौद्धिक प्रगल्भत : अशा अनेक गोष्टींसाठी तसेच मनुष्याचे जीवन हे अनेक प्रकारच्या घडामोडीने व्यापलेले असते. सुखदुःख, हार-जीत, चढ-उतार अशा अनेक प्रसंगाची रेलचेल त्याच्या जीवनात चालू असते आणि अशा समर प्रसंगातून जाताना त्याता तोंड द्यावयाचे म्हणजे मानसिक समतोल असणे गरजेचे असते त्याचे शरीर कंणखर असणे गरजेचे असते. मनातील अवास्तव भीती तसेच आत्मप्रौदी-अहंकार नाहिसा करण्यासाठी जीवनातील प्रसंगांना माघार न घेता सामोरे जाण्यासाठी, जीवन निरोगी सुखी समृद्ध करण्यासाठी, मनाच्या एकाग्रतेसाठी आणि मुख्य म्हणजे आपण आपली परंपरा आपली संस्कृती टीकवण्याचा केलेला प्रयत्न याच्या सार्थ अभिमानासाठी हा खेळ ही कला प्रत्येक स्त्री-पुरूषाने आत्मसात करावी.
आत्मरक्षणाच्या उद्देशातून निर्माण झालेली विविध आयुधे, या आयुधांचे गुरुकडे जाऊन शास्त्रोक्त पद्धतीने शिक्षण घेणे, त्या शिक्षणाचे, आत्मसात केलेल्या कलेचे व्यक्तिगत वा सांधिकरित्या सादरीकरण करणे, त्या त्या मिळवलेल्या शस्त्रास्त्रावरचे प्राविण्य प्रभुत्व लोकापुढे मांडणे तसेच आपले धारीष्ट्य, इ खवणे व त्यासाठी स्पर्धात्मक स्वरूपाचे प्रदर्शन करणे, कोणतीही कला, कोणतेही ज्ञान याच्या प्राप्तीसाठी गुरु असणे गरजेचे आहे. मेहनत कष्ट, चिकाटी, श्रद्धा, इच्छा, सहनशीलता हे गुण विद्यार्थ्यात असणे आवश्यक असते. युद्धाशी संबधित कला आपण शिकत असल्याने धाडस महत्त्वाचे असते. तालीम , आखाडा यामध्ये वस्ताद मंडळींच्या देखरेखीखाली या शस्त्रांचे प्रशिक्षण घेऊन,अंगमेहनत करून शरीर तयार करावे, वस्तांदाच्या नजरेखाली शरीर कमवल्यानंतर मर्दानी खेळाचा सराव करावा. बलवान व दमदार बनलेलत्या शरीर व मनाने ही कला अवगत करून देशकार्यास लावावी.
खेळातील आयुधे
"आयुर्ध तु प्रहरणम्ं" प्रहार करण्याचे साधन म्हणजे आयुध अशी आयुधाविषयी व्याख्या केली मेजी असती तरी या आयुधामध्ये शस्त्र व अस्त्र असे दोन विभाग पडलेले आढळतात. प्रहार करणे व संरक्षण करणे असा त्याचा ढोबळ अर्थ स्पष्ट आहे. तेव्हा या आयुधाविषयी प्रथम माहिती करून घेणे आवश्यक आहे. शस्त्र कशास म्हणावयाचे व अस्त्र कशास म्हणावयाचे याचबरोबर शस्त्र हे अमुक्त व अस्त्रे हे मुक्त, मुक्तामुक्त, यंत्रमुक्त असते है वर्गीकरण कसे याची माहिती असणे आवश्यक आहे. आणि याच गोष्टीचा आढावा आपण थोडक्यात घेणार आहोत. तीक्ष्ण असणारे असे घाव व घाव घालण्याबरोबरच छेद करणान्या किंवा जखम करणान्या व मृत्युस कारणीभूत होणान्या आयुधास शस्त्र म्हटले जाते तर मंत्राच्या किंवा अग्नी, वायू, विद्युत इ. अन्य साधनांचा उपयोग करून चालवली जाणारी व शस्त्राप्रमाणे काम साधणारी आयुधे ती अस्त्र होत.
दूरे चान्तेच यत् शस्त्रं शत्रुधातकरं भवेत्।
तदस्त्रमिति जानी यादन्था शस्त्रमुच्यते।
जे दूर तसेच जवळ असलेल्या शस्त्राचा घात करण्यास उपयोगी पडते ते म्हणजे अस्त्र होय. केवळ जवळच्याच शत्रूला मारण्यासाठी उपयोगी असते ते शस्त्र होय. साधारणत: कापणे, चुरकरणे, छेद करणे, लांबून परंतु हातात धरून उपयोगात येणे, दुरून फेकून उपयोगात आणणे इ. उपयोगासाठी शस्त्र व अस्त्र आयुधे वापरती जातात. आयुधे ही पोलाद व इतर धातू तसेच लाकूड, शिंग, हाडे इ. पासून बनवलेली असतात. शस्त्रास्त्रांना त्यांचा आकार, रचना वापरण्याची पद्धत त्यांच्या कामाचें स्वरूप यावरून त्यांची नावे पडल्याची किंवा दिल्पाची आढळतात. तसेच या आयुधाचे एकूण चार विभागात वर्गीकरण केल्पाचे दिसते. मुक्त, अमुक्त, मुक्तामुक्त, यंत्रमुक्त असे ते चार विभाग आहेत.
- मुक्त- जे अस्त्र निव्वळ हातानेच फेकून मारता येते, त्यास मुक्त अस्त्र असे म्हटले जाते. उदा.- शक्ती, चक्र इ.
- अमुक्त- निव्वळ हातात धरूनच ज्याचा उपयोग केला जातो किंवा कार्य साधले जाते ते शस्त्र उदा. - तलवार, गदा, पट्टा, फरशी इ
- मुक्तामुक्त- ज्या अस्त्राचा उपयोग हातात धरून तसेच हाताने फेकून मारून उपयोगात आणले जाते उदा.- भाता, त्रिशूल,
- यंत्रमुक्त - यांत्रिक साधनांचा वापर करून उपयोगात आणलेती आयुधे. उदा.- धनुष्यबाण, गोफण,शतघ्नी इ.
वापरणान्याच्या शक्तीवरहुकूम कार्य साधणाऱ्या शस्त्रास्त्राबरोबरच काही अस्त्र स्वतःच्या शक्तीवर कार्य सिद्ध साधतात , त्यास यंत्रमुक्त म्हटले जाते. मंत्र, उपचार, प्रयोग व संहार या क्रमाने चार भागात कार्यसिद्धी होत असल्याने महाभारतात अशा आयुधाचा चतुष्पाद असा उल्लेख केल्याचे आढळते. तसेच मायीक व निर्माय असे आणखी दोन भेद केल्याचे आढळते.
मायीक
विस्तृत माहिती साठी इथे वाचा .
निर्माय
विस्तृत माहिती साठी इथे वाचा .
हात
विस्तृत माहिती साठी इथे वाचा .
पवित्रा
विस्तृत माहिती साठी इथे वाचा .
अलिढ
विस्तृत माहिती साठी इथे वाचा .
प्रत्यालिढ
विस्तृत माहिती साठी इथे वाचा .
नरसिंह
विस्तृत माहिती साठी इथे वाचा .
हनुमंती
विस्तृत माहिती साठी इथे वाचा .
गरुड
विस्तृत माहिती साठी इथे वाचा .
फेक
विस्तृत माहिती साठी इथे वाचा .
सलामी
विस्तृत माहिती साठी इथे वाचा .
वार
विस्तृत माहिती साठी इथे वाचा .